भारताचा सातवा 7 वा क्रमांक देशांच्या यादीत

नवी दिल्ली – जगभरातील दोनहून अधिक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत फ्रान्सला मागे टाकून भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे. रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. तर फ्रान्समध्ये कोरोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकले असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दरम्यान, या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेतील जवळपास १८ लाख जणांना कोरोनाने ग्रासले आहे. अमेरिकेनंतर या यादीत ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचे पाच लाख तर रशियात चार लाख रुग्ण आहेत.